Hanuman Sena News

गणपती बाप्पांच्या अगमना आधी शहरातील सर्व रस्त्यांवरील गड्डे बुजवा - श्रीराम प्रतिष्ठाणची मागणी*




मलकापूर 
गणेशाचे आगमन आता  5 दिवसांवर आले आहे पण मलकापूर शहरातील नगर पालिका प्रशासनाने अजून सुध्दा रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सुरवात केली नसल्याने मलकापूर शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्रीराम प्रतिष्ठानने आज रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले या निवेदनात म्हटले आहे की मलकापूर शहरात जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले आहे व गणेशाच्या आगमनासाठी 5 दिवस उरले असतांना देखील नगर पालिका प्रशासन हे सुस्तच आहे आणि गणेशाच्या आगमन प्रसंगी घराघरातील गणपती चे आगमन हातगाडी ऑटो ने घरोघरी मूर्त्या नेल्या जातात याच खड्यांमुळे त्या मूर्त्यांची विटंबना होऊ शकते ते टाळण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने हे खड्डे बुजवणे गरजेचे आहे जर प्रशासनाने 2 दिवसात हे खड्डे बुजवले नाही तर श्रीराम प्रतिष्ठाण तिसऱ्या दिवशी हे रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चातून बुजवून टाकेलं या नगर पालिका प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन हे खड्डे बुजवण्यात यावे या आशयाचे आज रोजी श्रीराम प्रतिष्ठानने निवेदन दिले व निवेदन देते वेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष भाऊ माहूरकर व अनेक गणपती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post