Hanuman Sena News

शेतातील विद्युत कनेक्शनसाठी ४२ वर्षापूर्वी आजोबांनी मागणी करूनही विद्युत कनेक्शन न मिळाल्याने नातू चढला बीएसएनएलच्या टॉवरवर

   


मलकापूर  प्रतिनिधी 

  आजोबा ते नातू असा तीन पिठ्यांकडून शेतातील विद्युत -कनेक्शनसाठीचा संघर्ष करूनही विद्युत कनेक्शन मिळाले नसल्याने एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना ईश्वर सुपराव खराटे यांनी आज १५ ऑगस्ट रोजी चक्क बीएसएनएलच्या टॉवरवर चडून आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन केले . बडोदा पान्हेरा ता . मलकापूर येथील ईश्वर खराटे यांच्या आजोबांनी १६ / १२ / १ ९ ८० रोजी पावती क्र .०३५२ अन्वये रु .५५५ / - इतकी डिमांड नोट भरून शेतातील विहिरीवर विद्युत कनेक्शनसाठी मागणी केली होती . त्यानंतर आजोबा , वडील यांनी वेळोवेळी विद्युत कनेक्शनसाठी पाठपुरावा रूपराव केला त्यांचे निधन झाले तरी कनेक्शन मात्र मिळाले नाही . त्यानंतर नातू ईश्वर खराटे यांनी शेतात असलेल्या विहिरीतील पाण्याचा उत्पादना करीता उपयोग घेता यावा याकरीता अनेकदा विद्युत कनेक्शनसाठी पाठपुरावा केला .

    तत्कालीन मुख्यमंत्री ना . देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असतांना सन २०१ ९ मध्ये हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले होते . मात्र आजपर्यंतही गेल्या ४२ वर्षापासून सुरू असलेली ही लडाई विद्युत कनेक्शन न मिळाल्याने आता ईश्वर खराटे लढत आहे . काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना . एकनाथराव शिंदे यांना सुध्दा निवेदन देवून आपल्यावर झालेला अन्याय दूर करावा व शेताकरीता गेल्या ४२ वर्षांपूर्वी सर्व प्रक्रिया पुर्ण करूनही विद्युत कनेक्शन न मिळाल्याने ते देण्यात यावे , अशी मागणी केली होती . मात्र त्या निवेदनाची कुठलीही दखल न घेण्यात आल्याने त्यांनी चक्क आज बीएसएनएल टॉवरवर चढून आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन केले .

   ईश्वर खराटे हे विद्युत कनेक्शनसाठी बीएसएनएल टॉवरवर चढल्यानंतर वीज वितरण व इतर प्रशासकीय कार्यालयांची भांबेरी उडाली .. त्यानंतर वीज वितरणचे अधिकारी शेगावकर व मिश्रा हे त्याठिकाणी आले व त्यांनी आंदोलनकर्ते ईश्वर खराटे यांना आपला प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते खाली उतरले . एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येते , मात्र मलकापूर तालुक्यातील या शेतकऱ्याला केवळ शेतातील विद्युत कनेक्शन करीता आजोबा पासून ते नातवापर्यंत लढा दयावा लागत आहे , ही बाब कोठेतरी खेदजनकच आहे . असेच म्हणावे लागेल

Post a Comment

Previous Post Next Post