Hanuman Sena News

गणेश उत्सवानिमित्त मलकापूर शहरात शांतता समितीची बैठक संपन्न...

मलकापूर येथील भातृमंडळ येथे शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता समिती, सदस्यांच्या उपस्थितीत गणेश उत्सवानिमित्त शांतता समिती बैठक घेण्यात आली सदर बैठक जिल्हाधिकारी एस रामामूर्ति यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, तहसीलदार राजेंद्र सुरळकर, शहर पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिर्झा, दसरखेड एमआयडीसी पोलीस निरीक्षक आनंद महाजन, आरोग्य निरीक्षक योगेश घुगे, महावितरणचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे शहरातील शांतता कमिटी सदस्य तथा अशांतजी वानखेडे, हाजी रशीदखा जमादार, अरुण अग्रवाल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी शहरात व तालुक्यातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रथम पोलीस स्टेशनला मंडळाची नोंदणी आवश्यक आहे मंडळाची आरास करताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाहीत असे देखावे तयार करू नयेत व्यक्ति द्वेष वैयक्तिक भावना दुखावल्या जातील असेही देखावे सादर केले जाऊ नये जातीय सलोखा देशप्रेम समाज प्रबोधनात्मक एकतेचे दर्शन असे देखावे सादर केल्यास लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा हेतू सफल होईल शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तर वाईट प्रवृत्तीला आळा बसेल मलकापूर हे जातीय सलोख्याचे शहर असल्याचा इतिहास आहे हिंदू मुस्लिम दोन्ही धर्म एकोप्याने सण साजरा करतात तर निश्चित केलेल्या मार्गाने मिरवणूक काढण्यात येईल त्यासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा असे आपल्याला सूचना वजा मार्गदर्शन मनोगतातून जिल्हाधिकारी रामामूर्ती व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी शहरातील व तालुक्यातील बहुसंख्येने गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post