Hanuman Sena News

सत्ताधारी- विरोधक आमने-सामने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार खडाजंगी...

मुंबई :- शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी बाकावर वरील आमदार यांच्यात बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यावर जोरदार खडाजंगी झाली दोन्ही बाजूंनी सुरू झालेल्या घोषणाबाजीत वातावरण तापल्यामुळे आमदारांत धक्काबुक्की झाली शिंदे गटाचे महेश शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली सरकारच्या विरोधात जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार विधिमंडळात पायऱ्यांवर कापडी फलक घेऊन घोषणा देत असतात आंदोलन करत असतात मात्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा प्रसंग उद्भवला सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर घोषणा देत होते आणि पायऱ्यांवर बसले होते सभागृहाचे काम सुरू होण्याआधी सत्ताधारी - विरोधक आमने-सामने आले यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले  शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याची चित्र पाहायला मिळाले शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटावर विरोधी पक्षांनी "50 खोके एकदम ओके" "गद्दार" असे आरोप आणि घोषणा दिल्यामुळे त्या आमदारात खदखद होती त्यामुळे त्यांनी देखील "आरे ला कारे" हे धोरण अवलंबल्यामुळे ही धक्काबुक्की झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला

Post a Comment

Previous Post Next Post