भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार नेतृत्व स्व मोहनजीं पाचपांडे ह्यांचे 26 ऑगस्ट ला हृदयावीकाराच्या झटक्याने वयाच्या 48 व्या वर्षी अकस्मात निधन झाले.. त्यांचे निधन हे संपूर्ण समाजासाठी खूप मोठी हानी आहे.. त्यांची सामाजिक बांधिलकी ही खूप मोठी होती.. आज दि 29 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्ष, हनुमान सेना,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी संघटना, सर्व मित्र परिवार संघटना तर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये भाजप समवेत अनेक संघटना व संस्था तर्फे स्व मोहनभाऊंना श्रद्धांजली देण्यात आली..
सुरवातीला प्रस्ताविक मांडताना डॉ योगेश पटणी ह्यांनी मोहनभाऊसोबत च्या अनेक आठवणीना उजाळा दिला..
भाजप मलकापूर तर्फे श्री चैनसूखजी संचेती ह्यांनी आपल्या संवेदना व्यक्त करतांना मोहनभाउ च्या कार्याचा गौरव करत त्यांचे निधन हे फक्त भाजप साठीच नाही तर संपूर्ण मलकापूर वासि्यांसाठी अपूरणीय क्षती असल्याचे सांगितले.. आज अनेक संघटनानी आपल्या संवेदना व्यक्त केल्या ज्यात प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे जयंतजी राजूरकर सर, भाजप ग्रामीण तर्फे उमाताई तायडे, व्यापारी संघटना व चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे मनीषजी लखानी, विश्व हिंदू परिषद तर्फे सन्मती जैन , शेतकरी संघटने तर्फे दामोदरजी शर्मा, समतेचे निळे वादळ तर्फे अशांतभाई वानखेडे, पतंजली परिवार तर्फे हरिभाऊ पाटील सर, स्नेहीमित्र परिवारातर्फे राजेंद्रजी पांडे, यश संचेती, श्रीराम प्रतिष्ठान तर्फे आशिष माहूरकर, सुरेशजी संचेती, चंद्रकांत वर्मा ह्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या व श्रद्धांजली अर्पित केली.. हनुमान सेना, गजानन महाराज उत्सव सेवा समिती ट्रस्ट, योगा परिवार, सर्व समाज, डॉ असोसिएशन, आयुरवेद व्यासपीठ, रामदेव बाबा युवा मंच ,स्कूल संघटनांन तर्फे पण श्रद्धांजली देण्यात आली..
श्रद्धांजली सभेत भाजपा परीवार, हनुमान सेना परीवार, हिंदूवादी संघटना,तथा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मलकापूर चे असंख्य नागरिक उपस्थित होते..
Post a Comment