राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांच्याविरोधात चौकशी सुरु झाली आहे. जळगाव दूध संघात खडसेंचं वर्चस्व होतं. पण दूध संघात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांप्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. तसेच तिथे असलेलं संचालक मंडळ रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे जळगाव दूध संघातील खडसेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. या प्रकरणामुळे एकनाथराव खडसे आणि भाजप यांच्यातील पुन्हा संघर्ष वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी मोठं विधान केलं आहे. आपल्याला जेलमध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही जणांनी तर जेलमध्ये जाण्याच्या तारख्या देखील दिल्या आहेत, असं खळबळजनक विधान खडसेंनी केलं आहे. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत. जर काही केले नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं एकनाथराव खडसे रोखठोकपणे म्हणाले तुम्ही खोदा जेवढं खोदायचा आहे मात्र काही मिळणार नाही हे सरळ लढू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असे देखील एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीत मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात संघर्ष पुन्हा...
Hanuman Sena News
0
Post a Comment